सीआयडीतील ‘हा’ कलाकार काळाच्या पडद्याआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध मराठी लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक दिनेश साळवी यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ५३ वर्षाचे होते. बुधवारी रात्री मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकात जात असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं ते खाली बसले. आसपासच्या नागरिकांनी त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

दिनेश साळवी यांच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. सीआयडीसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. कॉलेजमधील बऱ्याच एकांकिका देखील त्यांनी बसवल्या. साळवी यांच्या आकस्मिक निधनामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजमधील रंगभूमीवर काम करणाऱ्या तरुण कलावंतांना धक्का बसला आहे.