‘या’ संतप्त प्रतिक्रियेनंतर अभिनेते गिरीश ओक का होतायेत ट्रोल ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच पसंत केली जाते. या मालिकेवर आजवर अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. परंतु यावेळी एका मीमवर मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे डॉ. गिरीश ओक यांनीच कमेंट केली आणि मीम शेअर करणारी युजर निशा सोनटक्के आणि ओक यांच्यात चांगलीच जुंपली. नंतर ओक यांनी निशाला रिप्लाय देताना लिहलं की, आम्ही रोज आमचा जीव धोक्यात घालून शुटला जातो. यानंतर अनेकांनी ओक यांना ट्रोल केलं आहे.

निशा सोनटक्के नावाच्या एका युजरनं फेसबुकवर एक मीम शेअर केलं. यावर गिरीश ओक यांनी कमेंट केली की, लॉकडाऊनच्या काळातही आतिशबाजी सुरूच आहे हे पाहून बरं वाटलं. यावर निशानं रिप्लाय दिला, तुम्हाला राग आला असेल परंतु माधी पोस्ट आली नाही तर लोक विचारतात निशा ताई कुठे आहात. खरं तर आम्ही केवढी जाहिरात करतो. तुमच्या डायरेक्टरला सांगा. आमच्या गँगला पार्टी हवी. पुरस्कार असतात तेव्हा आमच्या खुर्च्या राखीव हव्यात केवढी गँग जमवलीय बघा.

यावर ओक यांनी खोचक कमेंट केली, निशा तुमचा वेळ मजेत जातोय नं ? मग झालं तर पार्टी राखीव खुर्च्या म्हणजे जरा जास्त होत आहे. उलट तुम्हीच आमचे आभार मानले पाहिजेत की, काहीही (बुद्धी) खर्च न करता वेळ मजेत जातोय तुमचा. तुमच्या या मनोरंजानाच्या खाद्याकरता आम्हाला जीवावर उदार होऊन रोज शुटला बाहेर पडावं लागतं.

गिरीश ओक यांच्या कमेंटनंतर निशा आणि त्यांच्यातील वाकयुद्ध सुरूच होतं. यावर अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत ओक यांना ट्रोल केलं आहे. काहींनी तर ही मालिका त्यांना आवडत नाही असेही रिप्लाय दिले आहेत.