‘ऑडिशन’ला आलेल्या पोरीला जबरदस्तीनं ‘बिकिनी’वर फोटोशुट करायला लावणारा मराठी अभिनेता ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जबरदस्तीने बिकिनीवर शूट करायला लावत अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी मराठी अभिनेता आणि प्रसिध्द नाट्यकर्मी मंदार कुलकर्णी याला अटक करण्यात आली. या मुलीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडित मुलगी हि नाटकांमध्ये काम करण्यासाठी पूण्यात आली होती. त्यावेळी तिला मंदार कुलकर्णी याने बिकिनीत फोटोशूट करावे लागेल तसेच हे फोटोशूट नाटकासाठी असल्याचे सांगितले. तिने वन पीसमध्ये फोटो काढल्यानंतर त्याने तिला बिकिनीत फोटो काढण्यासाठी सांगितले. मात्र आपल्याला या गोष्टींची सवय नसून मी हे करणार नाही असे सांगितले. मात्र त्याने जबरदस्ती करत आपल्याकडून हे काम करून घेतल्याचा आरोप या मुलीने केला आहे. त्याचबरोबर त्याने फोटोशूट करताना आपल्या उघड्या पाठीचे फोटो जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप देखील या मुलीने केला आहे. त्याचबरोबर आपण केलेले फोटोशूट कुणाला सांगू नकोस असे देखील या मुलीला बजावले, या अशीदेखील तक्रार तिने पोलिसांना दिली आहे.

कोण आहे मंदार कुलकर्णी
त्याने ‘पक्के शेजारी’ या मालिकेत काम केले असून तो पुण्यात अनेक नाट्यशिबिरे घेत असतो. त्याचबरोबर पुण्याच्या पीडीए नाट्यसंस्थेत कार्यरत असून ‘लग्नबंबाळ’ या व्यावसायिक नाटकात त्याने काम केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –