मुंबई पोलिसांसोबत सिद्धार्थ जाधवचा ‘सेल्फी’, म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणार्‍या लोकांवर नियंत्रण ठेवण्यात मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली. घरातल्या लोकांची पर्वा न करता पोलीस बांधव रस्त्यावर तैनात होते. अनेक भागांत बंदोबस्तादरम्यान पोलिसांवर हल्लेही झाले, परंतू पोलिसांनी कधीही कर्तव्यात कसूर केली नाही. यादरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत सिद्धार्थ जाधवने सेल्फी काढत त्यांची इच्छा पूर्ण केली आहे. हा सेल्फी सिद्धार्थने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला आहे.

खडतर काळात कर्तव्य बाजवणार्‍या सर्व मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना मानाचा सलाम असे म्हणत सिद्धार्थने पोलिसांचे कौतुक केले आहे. लॉकडाउन काळात ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार अनलॉकच्या माध्यमातून काही गोष्टींना हळुहळु मान्यता देत आहेत. मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव या काळात आपला फिटनेस कायम राखण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात व्यायामासाठी हजेरी लावत असतो. त्यावेळी त्याने पोलिसांसोबत सेल्फी काढली.