ताई, राजकारण करायचे असेल ते गावाला जाऊन करा, सुबोध भावेनं कंगनाला सुनावलं

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्राी कंगणा रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आघाडीचा मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यानेही, ताई जे राजकारण करायचे असेल ते गावाला जाऊन करा, असे म्हणत खडे बोल सुनावले आहेत. रेणुका शहाणेनेही उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे ट्विट करत कंगनाच्या वक्तव्याचा समचार घेतला आहे.

https://twitter.com/subodhbhave/status/1301559899915128832

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात कंगना वादग्रस्त वक्तव्य करीत आहे. , मला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते असे म्हणत मुंबई पोलिसांवर निशाणा साधला होता. त्यानंतर काल तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असे म्हटले आहे. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटतेय?, असे ट्विट कंगनाने केले होते. या ट्विटवर सुबोध भावेने प्रतिक्रिया दिली आहे. ताई तुला जे राजकारण करायचे असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळाले, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा, असे सुबोधने कंगनाला सुनावले आहे.