मराठी अभिनेते गिरीश साळवी यांचं वरळीत निधन !

पोलीसनामा ऑनलाइन  – मराठी अभिनेते गिरीश साळवी यांचं वरळीतल्या राहत्या घरी निधन झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गिरीश दीर्घकाळापासून आजारी होते. अभिनेते आणि लेखक राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावरून गिरीश यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

गिरीश साळवींद्दल बोलायचं झालं तर ते उत्कृष्ट नट आणि दिग्दर्शक होते. त्यांची अनेक नाटकं फेमस आहेत. वरळीतल्या सुपरप्रवाह संस्थेतर्फे राज्यनाट्य आणि कामगार नाटक स्पर्धेत त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत.

गिरीश यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बुद्धीबळ आणि झब्बू, चौऱ्याहत्तर पावासाळ्यांचा जमाखर्च, तुमचं आमचं सेम असतं अशी अनेक प्रायोगिक नाटकं त्यांनी केली आहेत. पहिला राजा, समाधी, बाप हा बापच असतो अशा त्यांच्या आणखी काही नाटकांची नावं सांगता येतली. यापैकी अविष्कार संस्थेकडून गाजलेल्या त्यांच्या काही नाटकांची नावं सांगायची झाली तर जाता नाही जात, बुद्धीबळ आणि झब्बू, इंदू काळे वर सरला भोळे, चौऱ्याहत्तर पावसाळ्यांचा जमाखर्च ही नाटकं सांगता येतील. याशिवाय त्यांनी अनेक मराठी मालिकेतही काम केलं आहे.