मराठी अभिनेत्रीचा शिवसेना पदाधिकाऱ्यावर आरोप, म्हणाली – ‘योग्य वागणूक दिली नाही’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिनं एका शिवसेना पदाधिकाऱ्याने तिला योग्य वागणूक दिली नसल्याची तक्रार केली आहे. कार्यक्रमाला आमंत्रण दिल्यानंतर आपल्याला योग्य वागणूक दिली नाही त्यामुळे त्या शिवसेना पदाधिकाऱ्याने माफी मागावी अशी मागणीही तिने केली आहे. मिथुन खोपडे असं त्या पदाधिकाऱ्याचं नाव असल्याचं भाग्यश्री सांगते. भाग्यश्रीने आपल्या व्यथा मांडत एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

भाग्यश्री मोटे सांगते की, “8 जानेवारी आम्ही गडचांदूर (चंद्रपूर) येथे सकाळी कार्यक्रमासाठी पोहोचलो. आम्ही न्यायला तासभर कोणीच आलं नाही. चंद्रपूरला हॉटलेचं बुकींग केल्याचं सांगत त्यांच्या माणसांनी आम्हाला चंद्रूपरला नेलं परंतु तिथे पोहोचल्यावर कळलं की सगळ्या रूम बुक आहेत. नंतर एका साध्या हॉटेलात आमची राहण्याची सोय करण्यात आली. यानंतर आम्हाला तयार होण्यास सांगण्यात आलं. परंतु त्यासाठी काही सुविधा देण्यात आली नव्हती. तुम्ही तयार व्हा आणि नाही केली तयारी आणि आहे तशा आलात तरी चालेल असं उत्तर देण्यात आलं.”

https://www.instagram.com/tv/B7KxfDQHRnh/?utm_source=ig_embed

पुढे बोलताना भाग्यश्री सांगते की, “आम्ही 3 दिवसांपासून परतीच्या तिकीटाबद्दल विचारत होतो. परंतु तेही त्यांनी काढलं नव्हतं. तयारी केल्यानंतर आम्ही असंही सांगितलं होतं की परतीचं तिकीट असेल तरच आम्ही कार्यक्रमाला जाऊ. त्यांनी तिकीट बुक होईल असं सांगितलं होतं. नकार दिला असता, त्यांनी कार्यक्रमाची वेळ निघून जाईल आणि बदनामी होईल असं म्हणत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.”

भाग्यश्री मोटे म्हणाली, “कार्यक्रम होईपर्यंत अडीच तास आम्ही परतीच्या तिकीटाबद्दल विचारत होतो. बाजूला असूनही ती व्यक्ती आमचा फोन घेत नव्हती. अडीच तास थांबूनही आम्हाला 10 वाजेपर्यंत थांबण्यासाठी आग्रह केला जात होता जे योग्य नव्हतं. आम्ही जेव्हा तिथून निघालो तेव्हा आमचे कॉल घेणं बंद केलं गेलं. आमच्या मेसेजलाही उत्तर दिलं जात नव्हतं. नंतर फोनही बंद करण्यात आला.” असं ती म्हणाली.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/