‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या तसल्या फोटोमुळे आलेलं मोठं वादळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीत 90 च्या दशकात वर्षा उसगावकर हिने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले . तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्यानेही रसिकांना भुरळ घातली होती. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही ती आधीप्रमाणेच सुंदर आणि चिरतरुण दिसते . अशी सौंदर्याने भुरळ घालणारी ही अभिनेत्रीदेखील तिच्या एका फोटोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती .  तिने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

वर्षा उसगावकर हिने इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं . परंतु तिचं हे न्यूड फोटोशूट रसिकांना काही रुचलं नाही. अनेकांनी या फोटोशूटवरुन वर्षावर टीकाही केली होती . तिचं हे न्यूड फोटोशूट तिच्या चाहत्यांना काही आवडलं नाही . त्यामुळे ती त्यावेळी टीकेची धनी झाली होती . रसिकांच्या मोठ्या नाराजीचा वर्षा उसगावकर हिला सामना करावा लागला होता.

गंमत जंमत, हमाल दे धमाल, लपंडाव, भुताचा भाऊ यासारखे मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकरने साकारलेल्या भूमिका रसिकांना विशेष भावल्या. चंद्रकांता या लोकप्रिय मालिकेत वर्षाने रूपमती ही भूमिका साकारली होती . तर महाभारत या मालिकेत तिने अभिमन्यूची पत्नी ‘उत्तरा’ ही भूमिका साकारली होती . याशिवाय छोट्या पडद्यावरही तिने भूमिका साकारल्या होत्या.

वर्षा उसगावकरच्या मराठीतील या यशामुळे तिच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील दारंही उघडली . परवाने , तिरंगा , हस्ती , दूध का कर्ज , घर आया मेरा परदेसी अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर हिने भूमिका साकारल्या . परंतु या चित्रपटांमध्ये वर्षा उसगावकर हिच्या भूमिकांना म्हणावी तशी आणि तितकी लोकप्रियता मिळाली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us