‘हसत हसत ती बोलली चल लग्न करूया अन्…’, किशोरी शहाणेंची ‘प्रेम कथा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी तसेच हिंदी सिनेमात आपली वेगळी ओळख तयार केलेली अभिनेत्री किशोरी शहाणे हिला आपण सर्वजण ओळखतो. किशोरीनं अवघ्या 17 व्या वर्षी पहिला सिनेमा केला. अशोक सराफ, दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा प्रेम करूया खुल्लमखुल्ला हा सिनेमा आजही लक्षात आहे. या सिनेमाच्या निमित्तानं मराठी इंडस्ट्रीला किशोरी शहाणे हा नवा चेहरा मिळाला. आज आपण किशोरीची लव स्टोरी जाणून घेणार आहोत. एका मुलाखतीत त्यांनी याबाबत सांगितलं होतं.

दिग्दर्शक दीपक वीज हप्ता बंद सिनेमाचं दिग्दर्शन करत होते. यावेळी त्यांना शांत आणि सोज्वळ अभिनेत्री हवी होती. किशोरी आणि जॅकी श्रॉफची चांगली मैत्री होती. जॅकीनं दीपकला किशोरीचं नाव सुचवलं होतं. फिल्मीस्तान स्टु़डिओत किशोरी आणि दीपक यांची पहिली भेट झाली होती. पहिल्याच भेटीत दीपक यांनी किशोरीला फायनल केलं.

हप्ता बंद सिनेमामुळे दोघांची चांगली मैत्री झाली. एकमेकांचे कुटुंबीय एकमेकांना ओळखू लागले. 3-4 वर्ष दोघे मित्र होते. एक दिवस किशोरनं अचानक दीपक यांना विचारलं की, आपण लग्न करायचं का. दीपक यांनीही लगेच किशोरीला होकार दिला. घरातल्यांनीही त्यांच्या लग्नाला पाठिंबा दिला. 21 डिसेंबर रोजी दोघे विवाहबद्ध झाले. किशोरीनं दीपक यांच्या हप्ता बंद, बॉम्ब ब्लास्ट अशा सिनेमात कम केलं. लग्नानंतर तिनं काही हिंदी आणि मराठी मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. मराठी विश्वात आपला दबदबा झाल्यानंतर किशोरीनं हिंदी सिनेमात काम करण्यास सुरूवात केली.

किशोरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर किशोरीनं अकरावीत असताना प्रेम करूया खुल्लम खुल्ला या सिनेमात काम केलं होतं. प्रेम करूया खुल्लम खुल्ला, वाजवा रे वाजवा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, सगळीकडे बोंबाबोंब हे तिचे मराठी सिनेमे तुफान गाजले आहेत. हिंदी मालिकांविषयी बोलायचं झालं तर घर एक मंदिर, जस्सी जैसी कोई नही, सिंदूर अशा किशोरीच्या काही हिंदी मालिका विशेष गाजल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like