मराठी चित्रपटसृष्टीतील ‘ही’ अभिनेत्री मंजोलिकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांना हसवणारी अभिनेत्री नम्रता आवटे हिने नुकताच सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती अॅन्टिक लुकमध्ये दिसली. तिचा भयानक लुक पाहून प्रेक्षक नक्कीच घाबरतील यात शंका नाही.

नर्मताने सोनी मराठी वाहिनवरील महाराष्ट्र हास्यजत्रा या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमात तिने केलेला लुक तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. तिने अनेक ‘कॉमेडी शो’ केले आहे. यामध्ये तिने रसिकांना खळखळून हसविले आहे.

फोटोमागचे सत्य नर्मताने सांगितले आहे. ती म्हणते की, ‘या भीतीदायक फोटोमध्ये लपले आहे एक विनोदी सत्य. खूप दिवसांनी एका दिवसाकरिता मी सामील झाले हास्यजत्रेत. हा हॉर्रर कॉमेडी मेकअप मीच केला आहे.’

नम्रताने अनेक चित्रपटात काम केले आहे. यामध्ये ‘व्हेंटिलेटर’, ‘बाबू बँड बाजा’, ‘लूज कंट्रोल’ यांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यासोबत तिने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

काही महिन्यांपुर्वी नम्रताने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळाचे नाव तिने रुद्राज ठेवले आहे. तिने प्रग्नेंसी दरम्यान काही काळ अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. आता नम्रता पुन्हा कधी प्रेक्षकांच्या भेटीस येते ही उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.