अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा राजकारणात प्रवेश, ‘या’ दिवशी हाती घेणार राष्ट्रवादीचा झेंडा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे लवकरच राजकारणात एन्ट्री करणार आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत येत्या 7 जुलै 2020 रोजी प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा पुण्यातील पक्षाच्या कार्यालयात पार पडणार आहे.

प्रिया बेर्डे म्हणाल्या, “सिनेसृष्टीतील पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कर्मचारी यांच्यासाठी मला काम करण्याची इच्छा आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरू शकतो” असा विश्वास प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केला आहे.

‘म्हणूनच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला’
प्रिया पुढे म्हणाल्या, “पुणे शहर माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. याच ठिकाणी माझ्या मुलांचं शिक्षण झालं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचं कामही पुण्यातूनच सुरू आहे. म्हणूनच पुण्यात माझ्या नव्या कारकिर्दीरला सुरुवात करण्याची माझी इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शनही मला मिळेल. म्हणूनच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे” असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.

महत्त्वाचं म्हणजे, प्रिया बेर्डे यांच्यासोबत अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, निर्माते संतोष साखरे, सुधीर निकम आदी मंडळीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली आहे.

प्रिया यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमात त्यांनी काम केलं आहे. बजरंगाची कमाल, धमाल जोडी, जत्रा, तु. का. पाटील, रंपाट, रंगत संगत, अशी ही बनवाबनवी अशा अनेक सिनेमतात त्यांनी काम केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like