अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं शेअर केले साखरपुड्याचे फोटो, चाहते अवाक् !

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिनं तिचा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर याला इंट्रोड्युस केलं आहे. तिच्या इंस्टावरून तिनं काही फोटो शेअर केले. चाहतेही तिचे फोटो पाहून चकित झाले आहेत.

सोनालीनं 2 फेब्रुवारी रोजीच काही जवळची लोकं आणि कुटुंबाच्या उपस्थितीत कुणाल सोबत साखरपुडा उरकला होता. यानंतर तिनं वाढदिवसाच्या दिवशी (सोमवार दि 18 मे) फोटो शेअर करत याबाबत खुलासा केला आहे.

फोटो शेअर करताना सोनालनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणते, “माझ्या वाढदिवस संपण्याआधी मला तो आणखी स्पेशल करायचा आहे. एक घोषणा. माझा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर.”

कॅप्शनमध्ये सोनाली म्हणते, “आमचा साखरपुडा 2 फेब्रवारी 2020 रोजीच झाला. आमचा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी यापेक्षा चांगला आणि योग्य दिवस असू शकत नाही. तुमचे शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या.”

सध्या सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंज व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहते फोटोवर कमेंट करत सोनालीला शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी जोडीचंही कौतुक केलं आहे.