नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तेजस्विनी पंडित दिसली ‘जरीमरी आई’च्या रूपात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या निमित्ताने पहिल्या दिवशी अंबाबाईच्या रुपात फोटो शेअर करून महत्त्वाचा प्रश्न मांडला होता. यानंतर तिने दुसऱ्या दिवशी कामाख्याच्या रुपातील फोटो शेअर करून पुन्हा एक प्रश्न मांडला होता. तेजस्विनीने आता तिसऱ्या दिवशी पुन्हा एक कलाकृती शेअर केली आहे आणि महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे.

आज तिसऱ्या दिवशी तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोत दिसत आहे की, तेजस्विनी  जरीमरी आईच्या रुपात आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या एक खडकावर मत्स्यकन्येच्या रुपात जरीमरी आई बसली आहे. फोटोत दिसत आहे जरीमरी आईच्या आजूबाजूला गणेशमुर्तींचे अवशेष सोबतच इतर अनेक गोष्टी दिसत आहेत. यात प्लास्टिकच्या पिशव्या अर्धवट विरघळलेलया मूर्त्या, दारूच्या बाटल्या आणि घुसमटून मेलेले जलचर यांचा समावेश आहे. या फोटोला तेजस्विनीने खास कॅप्शनही दिलं आपल्या कलाकृतीतून तिने आणखी महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये तेजस्विनी म्हणते, “माझ्या तळाशी असलेलं सारं काही तुला पाहता येतं ते बळजबरीने ओरबाडून ही घेता येतं, पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही. कधी काळी मोती शंख शिंपल्यांनी उजळून जायचा माझा आसमंत .पण आता माझे अलंकार झालेत प्लास्टिक च्या पिशव्या , अर्धवट विरघळलेलया मूर्त्या, दारूच्या बाटल्या आणि घुसमटून मेलेले माझ्याच उदरातले जलचर. पहिल्यांदा माझ्या लाटांवर स्वार झाला होतास तेव्हा वाटलं नव्हतं माझी अशी फसवणूक करशील म्हणून…असं म्हणतात पेरिले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते आता तुझ्या या वागण्याचं कसं प्रत्युत्तर देऊ मी…माझ्या लाटांनी तुझं जीवन कसं समृद्ध करू मी ?”

Visit : Policenama.com