‘या’ मराठी अभिनेत्रीच्या ‘मेकओव्हर’ची सोशलवर ‘चर्चा’, चाहतेही ‘कन्फ्युज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि अभिनेते महेश कोठारेंची सून उर्मिला कानिटकर कोठारे सध्या आपल्या मेकओव्हरमुळं चर्चेत आली आहे. उर्मिलानं आपल्या लुकमध्ये कमालीचा बदल केला आहे. उर्मिला नवीन फोटोशुट केलं आहे. यातील काही फोटो तिनं इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. उर्मिला तिच्या या नवीन फोटोतील नवीन लुकमध्ये खूपच वेगळी दिसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उर्मिला सिनेमांपासून दूर आहे. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांना एक मुलगी आहे. तिचं नाव जिजा आहे. उर्मिला आपला जास्तीत जास्त वेळ जिजासोबत घालवते. असं असलं तरी उर्मिला सोशल मीडियावर मात्र सक्रिय असते.

सध्या उर्मिलाच्या नव्या फोटोशुटची खूप चर्चा सुरू आहे. अनेकांनी तर तिला ओळखलंही नाही. चाहत्यांना हे फोटोशुट खूप आवडलं आहे. अनेकांनी उर्मिलाच्या फोटोवर कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे. अनेक चाहत्यांसह कलाकारांनीही तिच्या फोटोला पसंती दाखवली आहे. उर्मिलाचा कॉन्फिडंट अंदाज पाहण्यासारखा आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like