मुंबईत कलाकार भवन उभारण्याची मागणी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (सुरज शेंडगे) – मराठी चित्रपट शृष्टीत आपले नशीब अजमावण्यासाठी येणाऱ्या आणि नवोदित म्हणून मराठी चित्रपट शृष्टीत करणाऱ्या कलाकारणासाठी मुंबईत राहण्यासाठी शिक्षक भवनाच्या धरतीवर कलाकार भवन उभारण्यात यावे अशी मागणी जेष्ठ सिनेअभिनेते सुनिल गोडबोले यांनी केली आहे. ते पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत

जेव्हा मी मुंबई मध्ये नाटक आणि चित्रपट शृष्टीत काम करण्यासाठी आलो तेव्हा मी दादरच्या रेल्वे स्टेशनवर झोपायचो आणि तेथेच असणाऱ्या सुलभ स्वच्छालयात अंघोळ करून मराठी मालिकेच्या चित्रीकरणासाठी जायचो. आज ही नवोदित कलाकारांची हीच अवस्था आहे. ते हि अशाच प्रकारे कोणत्या तरी रेल्वे स्टेशनचा सहारा घेऊन आपला अभिनय करत आहेत म्हणून सरकारने या कलाकारांचे दुःख लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कलाकार भवन उभा करावे अशी मागणी जेष्ठ अभिनेते सुनिल गोडबोले यांनी केली आहे. तर त्याच कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या विनायक मेटे यांनी म्हणले आहे कि , कलाकार भवन हा सरकारच्या प्राधान्य क्रमाचा मुद्दा असू शकत नाही परंतु मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मुद्द्यावर उद्याच भेटतो आपण अभिनेत्यांचे शिष्टमंडळ तयार करावे म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत मी आपली बैठक घालून देतो असे आश्वासन विनायक मेटे यांनी सुनिल गोडबोले यांना दिले आहे.

नाट्यचित्र कला अकादमी पुणे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात जेष्ठ अभिनेते सुनिल गोडबोले यांना नाट्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी सुनिल गोडबोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजवर मी अनेक मराठी नाटके केली असून घाशीराम कोतवालचे मी नवशेहुन अधिक प्रयोग केले आहेत असे अभिनेता गोडबोले म्हणाले. तर त्यांनी टीव्ही सुरु झाल्या पासून आज पर्यंत अखंडितपणे टीव्ही मालिकांमध्ये काम करत असल्याची कबुली दिली. त्याच प्रमाणे त्यांनी त्यांच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि दुनियादारी चित्रपटातील चित्रीकरणाच्या आठवणींना या कार्यक्रमात उजाळा दिला.