BigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का? : रेणुका शहाणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या मराठी बिग बॉसचे दुसरे पर्व चांगलेच गाजत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात रंगत आली आहे. तशीच रंगत बिग बॉसच्या घराबाहेरही दिसुन येत आहे. घरातील कलाकारांना त्यांच्या वागणूकीवरून चाहते परखत असतात. त्यावरून प्रक्षेक त्यांचे कौतुक आणि टीका दोन्ही करत असतात.

तसंच प्रक्षेक यावर प्रतिक्रिया देताना स्पर्धकांना टॅगही करतात. या स्पर्धेत अभिनेत्री किशोरी शहाणे सहभागी झाल्या आहेत. पण, प्रेक्षक प्रतिक्रिया देताना रेणुका शहाणेंना ट्विटरवर टॅग करत आहेत. दोघींची आडनावे सारखी असल्याने प्रेक्षक गोंधळून करत आहेत की मुद्दाम हे समजत नाहीये. परंतू या टॅगला वैतागूण रेणुका शहाणे यांनी प्रेक्षकांसाठी ट्वीट केले आहे.

रेणूका शाहणे यांनी केलेले ट्वीट हे रेणूका शाहणे आणि किशोरी शाहणे या नावातील फरक लक्षात आणून देणारे आहे. ‘चक्क हॅशटॅग shameonrenukaandparag चालवता? किशोरी आणि रेणुका मध्ये काहीच अंतर दिसत नाही का तुम्हाला? बघा नं! तिचं नाव “कि” नी सुरू होतं तर माझ्या नावाचा शेवट “का” नी होतो! तिच्या नावाचा शेवट “री” नी होतो आणि माझ्या नावाची सुरूवात “रे” नी होते. बघा! जमलं तर फरक शोधा, खूप सापडतील.’ असं ट्वीट त्यांनी केले आहे.

तसंच मी किशोरी शहाणे नाही,बिग बॉस मध्ये नाही, माझा ह्या कशाशीच काहीही संबंध नाही! कृपया मला टॅग करू नका. समाज माध्यमांचा गैरवापर टाळा. आणि कृपया विचार करा, अशी विनंतीही त्यांनी ट्विटमध्ये केली आहे.

दरम्यान, एका नेटकऱ्याने बिग बॉसमध्ये होणाऱ्या अन्नाच्या नासाडीवर ट्विट केले होते, त्यावर, ‘बिग बॉस मध्ये जाणाऱ्या लोकांकडून शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचार, ही अपेक्षा करणं त्या कार्यक्रमाच्या रूपरेखेशी सुसंगत आहे का?’ असा थेट सवाल रेणुका शहाणेंनी केला आहे. रेणूका शाहणे हे त्यांच्या अभिनयासह त्यांच्या स्पष्टवक्त्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यानेहमी चालूघडामोडींवर आपले मत व्यक्त करत असतात. मात्र यावेळी त्यांच्या संयमाचा बांध फुटल्याचे दिसून आले.

सिने जगत – 

मलाइका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल अरबाज खानने दिले मिडियाला ‘हे’ उत्तर

video : …म्हणून वैवाहिक जीवनात अभिनेता शाहिद कपूर आहे ‘सुखी’

‘या’ अभिनेत्याच लग्न होत, त्याच दिवशी वडिलांचं झालं होतं निधन

टिकटॉक कंपनीकडून युजर्संना ‘हे’ आवाहन

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like