Bigg Boss Marathi 2 : ‘त्या’ प्रसंगानंतर सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ‘माझी तर वाटच लागली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागाची सुरुवात जोमात झाल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच टीमचे दोन भागात विभाजन झाले आणि दोन्ही टीमला सीजनचे पहिले टास्क देण्यात आले. यावेळी टीमच्या विभाजनानंतर एका टीमचे नेतृत्त्व अभिजीत बिचुकलेकडे तर दुसऱ्या टीमचे वैशाली माडेकडे देण्यात आले.

माधव देवचके, किशोरी शहाणे विज, अभिजीत केळकर, विद्याधर जोशी आणि सुरेखा पुणेकर यांनी सादर केलेल्या क्रॉस ड्रेसिंग टास्कबाबत चर्चा करताना दिसून आले. यावेळी सुरेखा पुणेकरला असुविधाजनक कपडे घालायला सांगितेलेल्या टीमधील सदस्यांचा शेफ परागला राग आला. पराग त्याची बाजू मांडत म्हणतो, “मला त्यांच्या इज्जतीची काळजी आहे. ही लोकं कलावंत आहे.” सुरेखा मान्य करत प्रतिसाद देत म्हणते की, “माझी तर वाटच लागली सगळी” याशिवाय माधवही सुरेखाची बाजू घेतो.

इतकेच नाही तर पराग म्हणतो की, “माझे काही प्रिन्सिपल आहेत आयुष्यात, ती मी जपली आहेत.” हे ऐकून अभिजीत बिचुकले मान हलवत होकार दाखवतो.

माधव परागला प्रभावित होत त्याच्या मताची प्रशंसा करताना दिसतो. दोघेही लगेचच इतर मुलींना जे की स्पर्धक आहेत त्यांना विचारतात. यावेळी पराग म्हणतो की, “22- 23 वर्षांच्या मुली आहेत, त्यांना काय कळणार” त्याला असे वाटते की, त्या मुली सुरेखाची अस्वस्थता जाणण्यामध्ये असमर्थ ठरतात.

Loading...
You might also like