‘बिग बॉस’च्या घरात झाला ‘खून’, ‘हे’ दोघे ‘खुनी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस मराठीच्या घरात बुधवारी खून झाल्याचे तुम्हाला माहितीच असेल. परंतु हे वाचून जर चकित झाला असाल किंवा जरा घाबरला असाल तर थांबा. कारण हा खून खोटा आहे. कारण हा एक टास्कचा भाग होता. बिग बॉसमधील मर्डर मिस्ट्री टास्क. घरातील सदस्य सध्या आरोपीच्या शोधात आहे. शिव ठाकरे आणि शिवानी सुर्वे यांनी मिळून हा खून केला आहे. बिग बॉसच्या आदेशनुसार त्यांना घरातील सदस्यांचा सांकेतिक खून करावा लागणार आहे. अभिजीत त्यांना फोनवरून टास्क संदर्भातील आदेश देणार आहे.

बिग बॉसच्या घरात मर्डर मिस्ट्रीला सुरुवात झाली आहे. ही मर्डर मिस्ट्री एक टास्क आहे. या टास्कचं स्वरुप असं होतं की, प्रत्येकाला बिग बॉसने कन्फेशन रुममध्ये बोलावून दोन बनावट पिस्तुल देण्यात आल्या. यातील एक पिस्तुल सदस्याने निवडायचे होते. ज्या पिस्तुलातून गोळी निघेल ते पिस्तुल असणारा सदस्य मर्डर मिस्ट्रीमध्ये खुन्याच्या भूमिकेत असेल. इतर सदस्य सर्वसामान्य नागरिकांच्या भूमिकेत वावरतील. असा हा टास्क असल्याने शिव आणि शिवानी हे दोघे सध्या खुन्याच्या भुमिकेत आहेत.

आणखी एक टास्क असा होता ज्यात अभिजीत केळकरचं अपरहरण झालं आहे. बिग बॉसमधीलच एका प्रतिनिधीचं हे काम आहे. एका प्रतिनिधीनेच अभिजीतला सिक्रेट रुममध्ये नेलं आहे. आता पुढे असं आहे की, सिक्रेट रुममधूनच अभिजीतला शिव आणि शिवानी यांना आदेश द्यायचे आहेत.

 

Loading...
You might also like