मराठी बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार ‘या’ दिवशी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

हिंदी बिग बॉस नंतर आता मराठी बिग बॉस देखील चांगलेच प्रसिद्धीस आले आहे. मराठी बिग बॉसचा हा पहिलाच सिझन आहे. घरातील सदस्यांमध्ये वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे मराठी बिग बॉस सुरुवातीला हिट ठरला. आता या कार्यक्रमाचे पर्व शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचले आहे. पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत एकूण सहा सदस्यांनी धडक मारली आहे.  सई, पुष्कर, आस्ताद, स्मिता, शर्मिष्ठा आणि मेघा अंतिम फेरीपर्यंत पोहचले आहेत. आता यातील विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या रविवारी म्हणजेच २२ जुलै रोजी बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार आहे.

[amazon_link asins=’B01ID051D4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4bdd5ddb-8b60-11e8-9c11-6790e45aed5e’]

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य पूर्ण जिद्दीने प्रत्येक टास्क खेळले. हे घर मैत्री, भांडण, प्रेम, वाद – विवाद, वेगवेगळे टास्क, विकेंडचा डाव यामुळे चर्चेत राहिले. मेघा, सई आणि पुष्कर यांची मैत्री, सई आणि पुष्करची मैत्री, मेघाचे कार्यक्रमावरचे प्रेम, पुष्करची जिद्द, स्मिताचे प्रत्येक टास्क मन लावून खेळणं यामुळे सगळेच सदस्य प्रेक्षकांचे चाहते बनले. त्यामुळे या सगळ्यांमध्येच आता विजेता होण्यासाठी चढाओढ सुरू झाली असणार हे मात्र नक्की.

बिग  बॉस या कार्यक्रमात गेल्यापासून प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी मेहनत घेत आहे. या कार्यक्रमाचा अंतिम भाग आता काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या स्पर्धकांच्या फॅन्सनी अधिकाधिक मते देऊन आपल्याला विजेता बनवावे असे प्रत्येक स्पर्धकाला वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने पत्रकारांच्या माध्यमातून आजवर न मांडू शकलेल्या अनेक गोष्टी लोकांसमोर मांडल्या.