डॉ. अमोल कोल्हेंच्या घोषणेची सोशलवर ‘जोरदार’ चर्चा !

पोलीसनामा ऑनलाईन : स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते, निर्माते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी १४ डिसेंबरला फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी १८ डिसेंबरला एक मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. कोल्हे हे प्रसिद्ध व्यक्तिमहत्व असल्या कारणाने त्यांच्या या फेसबुक पोस्टवरील घोषणेची उत्सुकता अनेकांना लागली होती. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी या घोषणेचा उलगडा केला, त्यांच्या जगदंब क्रिएशन्सच्या अंतर्गत तीन चित्रपटांची निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात जगदंब क्रिएशन्स निर्मित तीन चित्रपटांची घोषणा केली. वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशी या तिन्ही चित्रपटांची नावं असून हे सर्व चित्रपट शिवकालीन असणार आहे. त्यातील वाघनखं हा चित्रपट ६ नोव्हेंबर २०२० ला प्रदर्शित होणार असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. यावेळी वाघनखं या चित्रपटाचा टीझरही लाँच करण्यात आला. प्रेक्षकांनीही या चित्रपटाच्या टीझरला चांगला प्रतिसाद दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/