व्हॉट्सॲप युजर्ससाठी लवकरच येणार ‘व्हॉट्सॲप लव’

मुंबई : वृत्तसंस्था – सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप अनेक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. ह्याच व्हॉट्सॲपशी निगडित व्हॉट्सॲप लव’ ह्या सिनेमाचा नुकताच पहिला टीजर मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. पोस्टर आणि शीर्षक पाहून याबाबत सर्वच वयोगटातील स्त्री-पुरूष व्हॉट्सॲप युजर्समध्ये जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे.
संपर्क साधणे आणि बंध जुळवणे सध्या व्हॉट्सॲपमुळे सहज शक्य झाले आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठीही व्हॉट्सॲप मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. प्रेम भावना आणि नातेसंबंधाना शाबूत ठेवण्यासाठी माध्यम ठरलेले ‘व्हॉट्सॲप’ सिनेमाचा विषय बनले आहे. अशातच ‘व्हॉट्सॲप लव’ ह्या सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि हल्लीच्या ऑनलाईन नातेसंबंधामुळे नेमका चित्रपट कशावर भाष्य करेल, हे समजणे कठीण आहे. पण, शीर्षक निश्चितच गमतीदार आणि आगळेवेगळे आहे. सिनेमात कलाकार कोण आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे. पण, प्रदर्शनाची तारीख ठळकपणे नमूद केली असल्याने पुढच्या गोष्टी लवकरच समोर येतील.
म्हणून व्हॉट्सॲप’ बनत आहे सिनेमाचा विषय –
सोशल मीडियाच्या सुरुवातीच्या काळात प्रेम हे ऑर्कुट वरून व्हायचं. नंतर त्याची जागा फेसबुकने घेतली. आता प्रेम ह्या गोष्टी जुळवण्यासाठी व्हॉट्सॲप मोलाची भूमिका बजावत आहे.
संपर्क साधणे आणि बंध जुळवणे ह्या व्हॉट्सॲपमुळे सहज शक्य झाले आहे. व्हॉट्सॲप वरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबुन असतो. किंबहूना गैरसमज अनेक होतात आणि पुढे प्रसरण पावतात. त्यामुळे थेट संवाद साधण्यासाठी न धजावणाऱ्या व्यक्तिलाही आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे अधिक सोपे वाटू लागले आणि प्रेमही व्यक्त करण्यासाठी हल्ली व्हॉट्सॲप मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे प्रेम भावना आणि नातेसंबंधाना शाबूत ठेवण्यासाठी माध्यम ठरलेले ‘व्हॉट्सॲप’ सिनेमाचा विषय बनले आहे.
एच.एम.जी. प्रस्तुत ‘व्हॉट्सॲप लव’या चित्रपटाला कथा, निर्मिती आणि दिग्दर्शिन  हेमंतकुमार महाले यांच आहे.  समीर दिक्षीत आणि हृषिकेश भिरंगी ह्या सिनेमाचे वितरक आहेत. एका नवीन विषयावर अधरीत असणारा हा चित्रपट ५ एप्रिल रोजी सर्वांच्या भेटीला येणार आहे.