अभिनेत्री रेशम टिपनीस करतेय ‘या’ व्यक्तिला ‘डेट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री रेशम टिपनीसला आपण सर्वच ओळखतो. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीजनमध्ये रेशम टिपनीस खूपच चर्चेत आली होती. मराठी सिनेजगतात तिचे अनेक चाहते आहेत. रेशमच्या खासगी आयुष्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असेल. तसं तर बिग बॉसच्या घरात आल्यानंतर रेशम आणि राजेश श्रृंगारपुरे यांचे सुत जुळल्याचे दिसले. तु्म्हाला माहीत आहे का की, बिग बॉसच्या घरात येण्याआधीपासूनच रेशम एका व्यक्तीला डेट करत आहे.

रेशम ज्या व्यक्तीला डेट करत आहे त्याचं नाव आहे संदेश किर्तीकर. रेशम सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने तिचे अनेक फोटो सोशलवर शेअर केले आहेत. रेशमने संदेशसोबतचे अनेक फोटो सोशलवर शेअर केले आहेत. काही फोटोत तुम्ही तिला संदेशसोबत पाहू शकता.

रेशमने वयाच्या 20 व्या वर्षीच लग्न केलं होतं. संजीव सेठी असं तिच्या पतीचं नाव असून तो तिच्याहून 12 वर्षांनी मोठा होता. या दोघांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. लग्नाला 11 वर्ष झाल्यानंतर दोघेही वेगळे झाले.

रेशमला एकूण दोन मुले आहेत. मुलाचे नाव आहे मानव आणि मुलीचे नाव आहे रिशिका. घटस्फोट झाल्यानंतर रेशम सिंगल मदर म्हणूनच आपल्या मुलांसोबत राहू लागली. तिच्या बोलण्यातून जाणवते की, कादाचित तिला घटस्फोटाचे वाईट वाटत आहे. कारण घटस्फोट घेण्याआधी एकदा विचार केला असता तर चांगले झाले असते अशी कबुली तिने बिग बॉसच्या सेटवर दिली आहे. रेशम आणि संदेशबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एकमेकांना अडीच वर्षांपासून डेट करत आहेत.

https://www.instagram.com/p/Bw3lyS4gp3F/

https://www.instagram.com/p/Bv4YO8bAI26/

https://www.instagram.com/p/Bt2_TkeAWbZ/

https://www.instagram.com/p/BtP8S5ogSXE/

https://www.instagram.com/p/BsIJEQBAH7N/

https://www.instagram.com/p/Br7rgmgATa2/

आरोग्यविषयक वृत्त –