मराठमोळ्या ‘चैतन्य’ची व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये छाप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘चैतन्य’दायी ठरला आहे. मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास भाग पाडलं आहे. जवळजवळ २० वर्षांनंतर भारतीय चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात पोहोचला होता. अभिमानाची बाब म्हणजे हा चित्रपट मराठी आहे. या चित्रपटानं भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

चैतन्य ताम्हाणे याच्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाला ७७ व्या आंतरराष्ट्रीय व्हेनिस चित्रपट महोत्सवात FIPRESCI च्या ‘इंटरनॅशनल क्रिटिक्स’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.या चित्रपट महोत्सवाची सुरुवात १९३२ साली करण्यात आली. या महोत्सवात २० वर्षांनंतर एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात १९३७ मध्ये चित्रपट ‘संत तुकाराम’ या भारतीय चित्रपटाला जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

‘कोर्ट’ या आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून चैतन्यनं चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली होती. ‘द डिसायपल’ हा त्याचा चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात दाखवण्यात आला.भारतातील शास्त्रीय संगीतावर आधारित हा चित्रपट आहे. शास्त्रीय गायक आदित्य मोडक हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अतोनात प्रेम आणि कष्टानं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे आता कष्टाचं चीज झालं अशी प्रतिक्रिया चैतन्यनं दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like