रणवीर आणि दीपिकाचा ‘हा’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट आणि प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण.. या जोडीची चर्चा खुप आहे. या दोघांना रामलीली, बाजीराव मस्तानी, पद्वावत अशा सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले असून चित्रपटात मुख्य भूमिका खुप प्रकारे साकारली आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या दोघांचा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. या दोघांचा ’83’ या चित्रपटात दीपिका आणि रणीवीर एकत्र झलकणार आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, ८३ चित्रपटात रणवीर सिंह १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. कपिल देव यांची खुप इच्छा होती की कपिलदेव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका पादुकोण यांनी करावी. दीपिकावर कोणीही काम करण्यासाठी जबरदस्ती करु नका, असे रणवीरने सांगितले होते. दीपिका सध्या ‘छपाक’ सिनेमात व्यस्त असल्याने ती ही भूमिका करेल की नाही असा प्रश्न सगळ्यांना होता. मात्र, तिने या चित्रपटाला होकार दिला आहे.

या चित्रपटाची कथी लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्या आधारित आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह, एमी विर्क, सकीब सलीम, चिराग पाटील, टाहीर भसीन, आदिनाथ कोठारे, जतिन सरणा, सहिल खट्टर, पंकज त्रिपाठी आदी कलाकार दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like