काय सांगता ! होय, रिंकू राजगुरु ‘राजकुमारा’च्या शोधात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी चित्रपटसृष्टीत वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु हीने ‘सैराट’ चित्रपटामधून रसिकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. आता तिचा ‘मेकअप’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती अभिनेता चिन्मय उदगीरकर याच्यासोबत काम करताना दिसणार आहे. दोघांची भन्नाट केमिस्ट्री चित्रपटामधून पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. तो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता अजून वाढली. या चित्रपटामध्ये रिंकू ही पुर्वी नावाची भूमिका साकारणार आहे तर चिन्मय डॉक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लग्नासाठी एकीकडे मुले बघत, त्याचबरोबर त्यांचा नाकार पचवणारी रिंकू म्हणजेच पुर्वी बिनधास्त आयुष्य जगताना दिसते. त्यामुळे चित्रपट फुल टू धमाल दिसत आहे. त्याचबरोबर यामध्ये काही ट्विस्टही आहे. हे ट्विस्ट म्हणजे रिंकू आपल्या स्वप्नातल्या राजकुमारची आतुरतेने वाट पाहत असते. तिचा ‘हॉट’ राजकुमार येणार का, हे चित्रपट पाहिल्यावर कळेलच.

चित्रपटामध्ये रिंकू आणि चिन्मयची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटात चिन्मय पहिल्यांदाच डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडित यांनी केले आहे. चित्रपटाच्या निमित्ताने गणेश यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे लेखनही त्यांचेच आहे. भन्नाट विषय हाताळण्यात त्याचा हातखंडा असल्याने ‘मेकअप’मध्येही असेच काहीतरी हटके पाहायला मिळणार, हे नक्की

https://www.instagram.com/p/BzR1WNtp0DR/

सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे पॅकेज असणाऱ्या या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ आदी चेहरेही झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.instagram.com/p/BufpGEUBW_E/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !