पाऊस जाण्याचं नावचं घेईना ! आज आणि उद्या पावसाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवसांपासून पावसाने राज्यात थैमान घातले आहे. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. पावसाने हैराण केले असून तो जाण्याचे नावच घेत नाही. आता पुन्हा पाऊस सतावतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी महाराष्ट्रात विक्रमी पावसाची नोंद झाली. आता हाच पाऊस पुन्हा परतणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अरबी समुद्रात ‘पवन’ नावाचे चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने पुढे सरत आहे. याचा परिणाम म्हणून आज (दि.4) आणि उद्या (दि.5) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल. 4 आणि 5 डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील 24 तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. दरम्यान आज (दि.4) महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यावर सोसायट्याचा वारा सुटण्याची शक्यात आहे. तसेच समुद्र खवळलेला असेल त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Visit : Policenama.com