57 वर्षीय विधवा महिलेला त्यांनी दाखवलं स्मार्ट ‘आमिष’, निर्जनस्थळी नेल्यावर सर्वच झालं ‘उलटं-सुलटं’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालयातून ज्येष्ठ नागरिकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक ५७ वर्षीय विधवा महिलेचे अपहरण करण्यात आले होते. त्या महिलेशी गोड बोलून खोटी आश्वासनं देत तिला विश्वासात घेऊन तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तिला एस.टी.प्रवास सवलतीचे स्मार्ट कार्ड बनवून देण्याचे आमिष दाखवले होते.

त्या महिलेने त्या इसमावर विश्वास ठेवला परंतु त्याने घात केला आणि महिलेस एक निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिलेने खचून न जाता दारूच्या नशेत असणाऱ्या भामट्याला एकाकी झुंज दिली. महिलेने केलेल्या प्रतिकारामुळे आरोपीने महिलेला मारहाण करत बेशुद्धावस्थेत फेकून तेथून पळ काढला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात या अज्ञात व्यक्ती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

घडलेला प्रकार असा की, हिंदी भाषेत बोलणाऱ्या या अनोळखी व्यक्तीने महिलेजवळ येऊन आधी ओळख निर्माण केली. आणि बसचे स्मार्ट कार्डसंबंधी काम करणारा आपला ओळखीतला आहे असे सांगून माझ्या सांगण्याने तुमचे स्मार्ट कार्ड चुटकी सरशी निघू शकते असे सांगत महिलेस सोबत येण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर त्याने महिलेस रिक्षातून पिंप्राळा हुडकोकडील सावखेडा शिवारात निर्जन पडीक जागेत घेऊन गेला. रिक्षातून जात असताना त्याने दारूच्या दुकानावर रिक्षा थांबवून त्याने सोबत दारूची बाटली घेतली होती. त्यानंतर रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास सावखेडा शिवारात त्याने दारू पिऊन महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर त्याने तिला बेदम मारहाण केली आणि तेथून तो फरार झाला.

दरम्यान, महिलेने आरडाओरडा करण्यास चालू केल्याने तो घाबरला आणि त्याने मिळेल त्याने महिलेस मारहाण करत तेथून पळ काढला. पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोळ्यांवर, तोंडावर मोठ्या प्रमाणात जखम झाली असून छातीत व पाठीवर मुका मार लागला आहे.

झालेल्या प्रकार शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जाकीर पठाण यांना समजताच त्यांनी सचिन सोनवणे, इस्माईल शेख मुस्ताक पिंजारी, नाजिम खानआदी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अर्धशुद्धीत अवस्थेत असणाऱ्या या महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तत्काळ रामानंदनगर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली.

रामानंदनगर पोलिस ठाण्याचे प्रदीप चौधरी, अनिल फेगडे यांच्यासह महिला पोलिस उपनिरीक्षक कांचन काळे, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी पिडीतेची भेट घेतली आणि घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. अनिल फेगडे यांनी जखमी महिलेचा जबाब घेतला असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/