नातीच्या वयाच्या दोन मुलींवर 51 वर्षीय व्यक्तीचे लैंगिक अत्याचार

रावेर/सावदा : पोलीसनामा ऑनलाइन – नातीच्या वयाच्या असलेल्या दोन सात वर्षाच्या मुलींवर 51 वर्षीय व्यक्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे. ही घटना रावेर तालुक्यातील गाते या ठिकाणी घडली आहे. घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. तर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयिताविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

चॉकलेटच्या बहाण्याने केले अत्याचार
गाते गावातील सात वर्षाच्या दोन लहान मुली मैत्रिणीसोबत गल्लीतील दुकानात चॉकलेट घेण्यासाठी नेहमी जात असत. त्याच गल्लीत राहणारा संशयित अरुण यशवंत मेढे (वय-51) याने या मुलींवर पाळत ठेवून त्यांना घरात बोलावत होता. मी तुम्हाला चॉकलेट आणि पैसे देतो असे आमिष दाखवू त्यांना घरात बोलावत होता. याच संधीचा फायदा घेत त्याने मागील दोन महिन्यात दोन वेळा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.

आरोपीला पोलीस कोठडी
अत्याचार करणाऱ्या अरुण मेढे याने दोन ते तीन दिवसांपूर्वी पुन्हा लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर मुलींनी हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत अरुण मेढे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 जानेवारी 2020 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव यांनी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पवार तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/