राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळयाप्रकरणी सुरेश जैन, गुलाबराव देवकरांसह सर्व दोषी, सर्वांना ताब्यात घ्या असा आदेश

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळयाप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह 48 आरोपींना धुळयाच्या विशेष न्यायालयाने आज (शनिवार) दोषी ठरविले आहे. न्या. सृष्टी नीळकंठ यांनी शनिवारी दुपारी हा निकाल दिला असून दोषी असलेल्या सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

घरकुल घोटाळयाचा निकाल आज (शनिवार) लागणार असल्याने सकाळपासुनच न्यायालयाच्या आवारात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षापासुन घरकुल घोटाळयाचा खटला चालु होता. खटल्यादरम्यान बचावपक्षाच्या वकिलांनी अनेक विनंत्या केल्या मात्र न्यायालयाने त्या अमान्य केल्या आहेत. या घोटाळयामध्ये माजीमंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह तब्बल 48 जण दोषी ठरविण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आज लागलेला निकाल हा खुप महत्वाचा मानला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like