१२ वी नंतर करिअर साठी ‘हे’ आहेत उत्‍तम पर्याय

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – विद्यार्थी जीवनामध्ये 10 वी आणि 12 वी ही खूप महत्वाची वर्ष असतात. १० वी किंवा १२ वी झाल्यानंतर आता पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या आई वडिलांना पडलेला असतो. पहिला प्रश्न तर करियर कोणत्या शाखेत करायचे आणि प्रवेश कोणत्या शाखेत घ्यायचा हा असतो. त्यानंतर आपण ज्या शाखेला प्रवेश घेतलाय त्या शाखेचा अभ्यास आपल्याला जमेल कि नाही याची अनेकांना भीती असते. सध्या करियरची अनेक नवनवीन क्षेत्र खुली झाली आहेत. पण आपल्याला त्या बाबत माहित नसल्यामुळे आपली परिस्थिती खूप गोंधळाची होऊन जाते. आणि जेव्हा कळते तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे गोंधळून न जाता जाणून घ्या बारावी नंतरच्या शिक्षणाचा मंत्र.

आर्टिस्ट

नवीन काही निर्माण करण्याची कला जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कलेच्या क्षेत्रात आपलं करियर करू शकता. कारण आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे. ती गोष्ट केलेली कधीही चांगली असते. त्यामुळे तुमच्याकडे काही कला असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात करियर करू शकता. फक्त त्यातील ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याचं ज्ञान तुम्हाला मिळवाव लागतं. आणि तुम्ही कोणत्याही कलेत पारंगत असाल तर त्याची मान्यता तुम्हला मिळवावी लागते. त्यामुळे कलेशी संबंधित ६ महिने १ वर्ष किंवा त्याहून जास्त कालावधीचा कोर्स तुम्ही करू शकता.

हॉटेल मॅनेजमेंट

जगात भूक नावाची गोष्ट जेव्हा लोप पावेल तेव्हाच हॉटेल या नावाला पूर्णविराम मिळेल. आणि ते कधीही शक्य नाही. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट हा करियरचा कधीही न संपणारा पर्याय आहे. आणि जगभरात कुठेही करियरची संधी उपलब्ध करून देणारा हा कोर्स आहे. हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला १२ वी पास असणे गरजेचे आहे. तसेच कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, कम्यूनिकेशन स्किल याच्या आधारावर तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता. हा कोर्स सर्टिफिकेट, डिप्लोमा व बॅचलर डिग्री अशा स्वरूपात उपलब्ध आहे.

मर्चंट नेव्ही

मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही विज्ञान शाखेतून १२ वी कमीत कमी ६०% गुणांनी उत्तीर्ण झालेले असावेत. तसेच तुम्हाला आगोदर प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्यांनतर तुम्हाला मर्चंट नेव्ही या अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेता येईल. यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने करियर करू शकता.