‘तान्हाजी’ सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज झाला आहे. एका दिवसातच या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा हिंदी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला होता. सध्या सोशलवर तान्हाजी सिनेमाचा मराठी भाषेतील ट्रेलर व्हायरल होताना दिसत आहे. ओम राऊत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अभिनेता अजय देवगननं यात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री आणि अजय देवगनची पत्नी काजोल हिनं या सिनेमात तानाजींच्या पत्नीची म्हणजे सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे.

तान्हाजी सिनेमा मराठीत येत असल्यानं आणि मराठी ट्रेलर रिलीज झाल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं याबाबत ट्विट करत माहिती दिली होती की, 10 डिसेंबर 2019 रोजी मराठी भाषेत तान्हाजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. शरद केळकरनं या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. याशिवाय या सिनेमात देवदत्त नागे (सूर्याजी मालुसरे), शशांक शेंडे (शेलार मामा) हेही कलाकार आहेत.

दरम्यान तान्हाजी सिनेमाला घेऊन चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पहायला मिळत आहे. या सिनेमात अभिनेता सैफ अली खान किल्लेदार उदयभान राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. अजयचा हा 100 वा सिनेमा असून थ्रीडीमध्ये आहे.

Visit :  Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like