‘ही’ मराठमोळी अभिनेत्री कार विकून चालवते रिक्षा ! कारण वाचून ‘अवाक्’ व्हाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुम्ही कधी कोणत्या अभिनेत्रीला रिक्षा चालवत सेटवर येताना पाहिलं आहे का ? नाही ना. नक्कीच पाहिलं नसेल. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. या मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव यशश्री मसुरकर आहे.

फिल्म इंडस्ट्रीत यशाच्या शिखरावर असताना यशश्रीनं तिची कार विकली आणि रिक्षा खरेदी केली. एवढ्यावरच ती थांबली नाही तर ती स्वत:च ही रिक्षा चालवू लागली. खास बात अशी की, रिक्षामधूनच ती शुटींगसाठी ये जा करू लागली. यावरून तिच्या सहकलाकारांनी अनेकदा तिची खिल्ली उडवली आहे. परंत तिनं हे काही फारसं मनावर घेतलं नाही आणि याची पर्वाही कधी केली नाही.

https://www.instagram.com/p/B90jrZFF6tI/?utm_source=ig_embed

याबाबत बोलताना यशश्रीनं सांगितलं की, तिचा परदेशातला मित्र भारतात फिरायला आला होता. या खास कारणामुळं तिनं कार विकून रिक्षा खरेदी केली होती. नंतर रिक्षाचं काय करणार हा विचार करून ती स्वत:च ही रिक्षा चालवू लागली. यामुळं वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते.

स्वत:च रिक्षा चालवत अस्लयानं तिचा गोर गरीब जनतेमधील वावरही वाढला. ती अनेकदा गरीब मुलांसोबत फिरताना दिसते. मुलांना शाळेतही तिनं सोडलं आहे. कार असती तर असं जगता आलं नसतं. यात एक वेगळाच आनंद आहे असं ती सांगते. यशश्रीची सध्या सोशलवर खूप चर्चा होताना दिसत आहे.

यशश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक मराठी, हिंदी मालिकेत काम केलं आहे. रंग बदलती ओढणी, चक्रवर्ती अशोक सम्राट, दो दिल बंधे एक डोरी से, आरंभ अशा तिच्या काही मालिका सांगता येतील. स्वप्नीला जोशीच्या लाल इश्क या सिनेमातही ती झळकली आहे. यशश्री आरजेसुद्धा आहे.