भीषण अपघातात प्रसिध्द डॉक्टरचा मृत्यू तर मनेसेचे शहराध्यक्ष जखमी

पोलीसनामा : ऑनलाईन टीम – औरंगाबाद – पुणे महामार्गावर कार आणि ट्रकच्या अपघातात गंगापूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अमोल अप्पासाहेब वावरे यांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मुकूंद भास्कर पाठे हे देखील जखमी झाली आहे. औरंगाबाद – पुणे महामार्गावरील जिकठाण फाट्याजवळ रात्री हा अपघात झाला.

डॉक्टर अमोल वावरे हे पत्नी आणि मैत्रिणी सोबत चित्रपट बघायला गेले होते, त्यानंतर डॉ. अमोल वावरे आणि मुकूंद पाठे यांचे काम औरंगाबादमध्ये काम असल्याने अमोल यांनी पत्नीला मैत्रिणींनी सोबत बसने घरी जाण्यास सांगितले.

औरंगाबाद शहरात काम झाल्यानंतर डॉ. अमोल वावरे आणि मुकूंद पाठे हे गंगापूरच्या दिशेने निघाले होते. जिकठाण फाट्याजवळ उभारण्यात आलेल्या गतिरोधकासमोर गाडीपुढे चालणाऱ्या ट्रक अचानक थांबल्याने डॉ. अमोल वावरे यांची गाडी पुढील ट्रकला धडकली. त्यामुळे ट्रकमधील सळई डॉ. वावरे यांच्या अंगात शिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार मध्ये बसलेले पाठे हे जखमी झाले आहेत. मुकूंद भास्कर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही