‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’च्या व्हिडीओ प्रकरणी पहिला FIR दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सिडको, सातारा आणि छावणी परिसरातून ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’चे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. फेसबुकसह इतर सोशल मीडियावर अश्या बाल लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात होते. दरम्यान, याप्रकरणी व्हिडिओ अपलोड करणाऱ्या फेसबुक प्रोफाइलविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिल्लीतील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने पहिल्यांदाच पुढाकार घेत ही कारवाई केली.

या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्लीच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने तातडीने महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संपर्क साधला. त्यांनतर तातडीने 18 डिसेंबर 2019 रोजी राज्यातील सर्वच सायबर क्राईम पोलीस ठाण्यांना गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सिडको हद्दीतून तसेच साताऱ्यातून चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ फेसबुकवर लोड केल्याचे दिसून आले. ज्या व्यक्तीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत त्या संगणकाच्या आयपी ॲड्रेस अथवा वापरलेल्या मोबाइल सिम कार्ड क्रमांकावरून संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात आहे.

दरम्यान, पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशाप्रमाणेच देशातही चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी घालण्यात यावी, म्हणून महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात व्हिडिओ ‘सीडी’ज तयार केल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीची माहिती समोर येऊ नये, म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/