‘पवार’ कधी कोणाला कळाले नाहीत अन् कळणार नाही, आ. रोहित पवार असं का म्हणाले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पवार कधी कोणाला कळाले नाहीत आणि कळणारही नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. एकत्रित काम करणं म्हणजेच पवार आणि शेवटपर्यंत एकत्रच राहतील ते पवार असंही ते म्हणाले. औरंगाबादमधील महाएक्सपो कार्यक्रमात युवकांशी बोलताना रोहित यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी तरुणांना रोजागाराविषयी मोलाचा सल्लाही दिला.

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या आगमनानंतर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी पवार कुटुंबातील कोणीही व्यक्ती तिथे उपस्थित नव्हता. यावरून चर्चा सरू होती याबाबत रोहित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “रिकाम्या लोकांना काही कामे नसतात. तेच अशा पद्धतीने चर्चा करत असतात. दादांचं स्वागत होत असताना तो कार्यक्रम पूर्वनियोजित नव्हता. त्यावेळी मी माझ्या मतदारसंघात नागरिकांशी चर्चा करत होतो. मी जाणारही होतो परंतु दादाच मला म्हणाले तू तुझं काम कर. म्हणून मी गेलो नाही. पवार कधी कोणाला कळाले नाहीत आणि कळणारही नाहीत.” असा टोला त्यांनी चर्चा करणाऱ्यांना लगावला.

सारथीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “सारथी सुरू झाली पाहिजे. तिला ताकद दिली पाहिजे. सारथी सुरू करण्यात काही अडचणी आहेत. सुप्रियाताई असतील तसेच आम्हीही सर्व पाठपुरावा करत आहोत. बार्टी, ज्योती आणि सारथी यांसारख्या योजनांचा गोरगरिबांच्या मुलांना फायदा झाला पाहिजे.”

शेतकरी आत्महत्या आणि शिक्षणपद्धतीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “शेतकरी आत्महत्येवर गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. सरकारने काही पावलं उचलायला हवीत. आजची शिक्षणपद्धतीही बदलली पाहिजे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आपण याबाबत भेटून बोलणार आहोत” असेही त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/