Marathwada Teacher Constituency Election | मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरीचा फटका; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली बंडखोरी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी झाल्यानंतर आता मराठवाडा विभागात (Marathwada Teacher Constituency Election) देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काहीशी काँग्रेस पक्षासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदिप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी केल्याचे उघड झाले आहे. (Marathwada Teacher Constituency Election)

 

मराठवाडा विभागातून (Marathwada Teacher Constituency Election) महाविकास आघाडीकडून चौथ्यांदा विद्यमान आमदार विक्रम काळे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदिप सोळुंके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यातील विशेष बाब म्हणजे आज (दि.१६) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी केल्याचे आता उघड झाले आहे.

 

या सर्व प्रकारावर बोलताना प्रदिप सोळुंके म्हणाले की, ‘माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी तुमचे काम करुन तुम्हाला मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून तीनवेळा निवडून दिले. पण तुम्ही आमच्याकडे ढुंकून देखील पाहत नाही. मग तुम्ही शिक्षकांचे प्रश्न काय सोडवणार. पक्षाने तुम्हाला तिसऱ्यांदा उमेदवारी दिलीच कशी? हा खरा प्रश्न माझ्यासह इतरांना देखील पडला आहे. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेणार नाही.’ असं यावेळी बोलताना प्रदीप सोळुंके म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विक्रम काळे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

मागील गेल्या १८ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे हे मराठवाडा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.
तसेच यंदादेखील त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवत त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे त्यांच्याकडून निवडणुकीसाठीची सर्व तयारी करण्यात आली आहे.
पण, त्यातच आता त्यांच्याच पक्षातील नेत्याने आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी
अर्ज मागे न घेतल्यामुळे विद्यमान आमदार विक्रम काळे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर देखील प्रदिप सोळुंके यांनी पक्षाच्या विरोधात जात अर्ज दाखल
केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता प्रदिप सोळुंके यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Marathwada Teacher Constituency Election | the election of the marathwada teacher s constituency there was a rebellion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | खाणीत पडून 21 वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

Nashik Graduate Constituency Election | नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील माध्यमांसमोर येताच म्हणाल्या…

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्याबाबतची ‘ती’ भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्पष्ट करावी – किरीट सोमय्या