पालकांनो सावधान ! ‘हे’ परीक्षा मंडळ अनधिकृत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  शासनाने ‘मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ’ असा उल्लेख असलेली संस्था अनधिकृत असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे या संस्थेत प्रवेश घेताना पालकांनी सावधानता बाळगायला हवी असे आवाहन औरंगाबाद येथील विभागीय तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ. आनंद पवार यांनी केले आहे. सदर संस्था ही अनधिकृत आहे याविषयाचा अहवाल शासनाला पाठविल्यानंतर शासनाने याबाबत घोषणा केली आहे.

राम मंदिर तर सोडाच, महाराष्ट्रातील ‘हे’ ही मंदिर धोक्यात  

साधारणपणे दहावीनंतर कौशल्य आधारित शिक्षण घेतल्यानंतर तात्काळ नोकरी लागते. यामुळे विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांना ओढा असतो. यामुळेच अनेक बनावट संस्था या गोष्टीचा फायदा घेतात. याबाबत अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत.  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे १८६ पदविका अभ्यासक्रम (एआयसीटीई मान्यताप्राप्त ८० व शासन मान्य अल्पमुदतीचे १०६ अभ्यासक्रम) राबविले जातात. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या औरंगाबाद येथील विभागीय तंत्रशिक्षण मंडळांतर्गत मराठवाड्यातील ८ व नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या ५ जिल्ह्यांमध्ये सुमारे ४०० महाविद्यालये संलग्न आहेत असेही समजत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र अधिनियम, २०१३ नुसार कारवाई करून मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ ही संस्था पदविका देण्यास पात्र नसल्याचे संचालकांनी स्पष्ट केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. औरंगाबाद येथील ‘मराठवाडा तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ’ या संस्थेने पदविका अभ्यासक्रमातील तब्बल १९ अभ्यासक्रम सुरू केले आहेत. परंतु  हे अभ्यासक्रम अनधिकृत ठरविले आहेत. शिवाय येथे प्रवेश घेऊ नका, असे आवाहन राज्य तंत्रशिक्षण मंडळाने केल्याचे समजत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us