राज्यात पाण्याचे भीषण संकट; मराठवाडा, विदर्भाला बसणार चटके 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील धरणे आणि लहान मोठ्या तीन हजार २६६ पाणी प्रकल्पांमध्ये अवघा ६४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सर्वाधिक भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून, त्याखालोखाल नागपूर, अमरावती आणि नाशिकमध्ये पाणी संकट उभे राहिले आहे. पुणे जिल्ह्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. विशेष म्हणजे समाधानकारक पाऊस पडणाऱ्या कोकणातही पाणीप्रश्न उद्भवण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.

ब्रह्मोस मिसाईल माहिती प्रकरण : निशांतचा संबंध संघाशी जोडणाऱ्याविरुद्ध तक्रार

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c294154d-cdd6-11e8-bedb-595448e40aa8′]

पावसाचा हंगाम संपत आल्याने जलसंपदा विभागाने राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला आहे. त्यानुसार राज्यात १४० मोठी धरणे असून, २५८ मध्यम प्रकल्प आणि दोन हजार ८६८ लघु प्रकल्प आहेत. या विविध धरणे आणि लघु प्रकल्पांमध्ये असलेला पाणीसाठा हा सुमारे ६४ टक्के असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत हा पाणीसाठा सुमारे ७६ टक्के होता.

[amazon_link asins=’B018KII2SA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb9c3f07-cdd6-11e8-98eb-1d80b92e4efd’]

राज्यात पुणे, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक आणि मराठवाडा असे सहा विभाग असून, यापैकी सर्वांत कमी पाणीसाठा हा मराठवाडा विभागातील धरणांमध्ये सुमारे २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत सुमारे ६७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा प्रदेशामध्ये पाण्याबाबतीत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे. मराठवाडा विभागानंतर नागपूर विभागामध्ये हीच स्थित आहे. येथे धरणे आणि विविध प्रकल्पांमध्ये सुमारे ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी या विभागातील धरणे सुमारे ४० टक्के धरली होती. मराठवाडा आणि नागपूर या विभागांनंतर अमरावती विभागांमध्येही पाणीसाठ्याबाबतीत टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विभागातील धरणांमध्ये सुमारे ५६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, जमेची बाजू म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या भागात तुलनेने जास्त पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी अवघा ३९ टक्के पाणीसाठा होता.

#MeToo : दिग्दर्शक सुभाष घईंवर बलात्काराचा आरोप

पुणे जिल्ह्यात प्रमुख धरणांबरोबर ७२६ मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. धरणे आणि प्रकल्पांमध्ये सुमारे ८० टक्के पाणीसाठा असल्याचे उघड झाले आहे. गेल्यावर्षी या दिवसापर्यंत सुमारे ९१ टक्के धरणे भरली होती. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या पाणीसाठ्याबाबतीत परिस्थिती निराशाजनक आहे.