March 2022 Deadline For Big Tasks | 31 मार्च 2022 पुर्वी पुर्ण करा ‘ही’ 7 महत्वाची कामे, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – March 2022 Deadline For Big Tasks | 2022 चे नववर्ष लागलं आहे. या वर्षातील सर्वात महत्वाचा महिना म्हणजे मार्च महिना असतो. आर्थिक वर्ष (Financial Year) म्हणून मार्च महिना महत्वपूर्ण महिना आहे. दरम्यान, महिना अखेरपूर्वी अशा अनेक कामाची पुर्तता करणे आवश्यक असते. 31 मार्च अखेर सर्व कामे पुर्ण करणे गरजेचे आहेत. समजा असे संबधित महत्वाचे कामे त्या अंतिम मुदतीत न झाल्यास जास्त दंड देखील द्यावा लागू शकतो. केंद्र सरकारने (Central Government) विविध योजना, कामांसाठी अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवून दिले आहे. कोणते कामे पुर्ण करणे गरजेचे आहेत. याबाबत जाणून घ्या. (March 2022 Deadline For Big Tasks)

 

– ITR व्हेरिफाय करणे –

ज्या करदात्यांनी अजुन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या आयकर परताव्याचे (Income Tax Return) ई-व्हेरिफिकेशन (ITR Verification Date) केले नाही, ते करदाते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांच्या आयटीआर (ITR ) चे ई-व्हेरिफिकेशन करू शकणार आहात.

 

– हयातीचा दाखला देणे –

केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला (Life Certificate For Pensioners) बँकेत सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 वरून 28 फेब्रुवारी (2022) पर्यंत वाढवली आहे. आता पेन्शनधारक 28 फेब्रुवारी (2022) पर्यंत त्यांचा हयातीचा दाखला (life certificate) सादर करू शकणार आहात.

 

– आर्थिक वर्ष 2020-21 साठी अग्रिम Tax भरण्याची शेवटची तारीख –

यासाठी अग्रिम टॅक्स (Advance Tax) भरण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 आहे. जर तुम्ही आयकर ब्रॅकेटमध्ये (Income Tax Bracket) येत असल्यास तुम्हाला तुमचा टॅक्स वेळेवर भरावा लागणार आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीने या तारखेपर्यंत अॅडव्हान्स टॅक्स (Advance tax) भरला नसेल तर कलम 234 A /234 B अंतर्गत व्याज लागू होणार आहे. यामध्येही ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) सवलत आहे. (March 2022 Deadline For Big Tasks)

 

– आधारशी PAN लिंक –

अजुन तुमच्या आधार क्रमांकाशी पॅन लिंक केले नाही तर (PAN Aadhaar linking Deadline ) तुम्ही हे काम 31 मार्च 2022 पूर्वी करणे गरजेचे आहे. या तारखेपर्यंत तुमचा पॅन तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केला नाही, तर त्यामध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे. तो पॅन निष्क्रिय होऊ शकतो. त्याचबरोबर संबधित व्यक्तीला 1 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

 

– बिलेटेड ITR फाइलिंग –

2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Return) रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 होती, जी आता संपली आहे. ज्यांची 31 डिसेंबरची अंतिम मुदत चुकली आहे, त्यांना अद्याप विलंब शुल्क भरावा लागणार आहे. आणि आयटीआर भरावा. आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची मूळ मुदत संपल्यानंतर, बिलेटेड रिटर्न भरण्याची संधी असते, पण यासाठी दंड आकारला जातो. यातही अंतिम मुदत 31 मार्च 2022 आहे. ITR उशीरा भरल्यामुळे 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

 

– टॅक्स सेव्हिंग केल्याची खात्री करणे –

2021-22 साठी जुन्या टॅक्स प्रणालीची निवड केली असल्यास, 31 मार्च 2022 पर्यंत
तुमचा टॅक्स सेव्हिंग (Tax Saving) पर्यायाचा फायदा घेऊ शकणार आहे.
सर्व सेक्शनच्या अंतर्गत असणाऱ्या टॅक्स डिडक्शन सुविधेचा लाभ घेतला आहे,
याची खात्री करदात्यांना करावी लागणार आहे.
तसेच, कलम 80 सी मध्ये 1.5 लाखांपर्यंत, NPS योगदानासाठी कलम 80 CCD (1-B)
अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत वैद्यकीय विमा प्रीमियम (Medical Insurance Premium)
वर 50 हजार रुपये टॅक्स लाभ मिळणार आहे.

 

– बँक KYC –

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने KYC पूर्ण करण्याची
अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ऐवजी 31 मार्च 2022 केलीय.
KYC अंतर्गत, बँक ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड (PAN Card), आधार (Aadhaar),
पासपोर्ट (Passport) इत्यादी अपडेट करण्यास सांगत आहे.
तसेच, अलीकडचा पासपोर्ट फोटो आणि अन्य माहिती देखील घेतली जाते.

 

Web Title :- March 2022 Deadline For Big Tasks | 31 march 2022 deadline complete these 7 big tasks before march 2022 or ready to pay big penalty

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा