7 मार्च राशीफल : ‘या’ 5 राशीच्या लोकांनी रहावं ‘सावध’, ग्रह नक्षत्र देत आहेत ‘संकेत’

पोलीसनामा ऑनलाइन
मेष

तुम्ही सरकारकडून कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने लाभ मिळवू शकता. जर तुम्ही वेळेवर संधीचा उपयोग करून घेतला, तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात अत्याधिक लाभ देईल. जोडीदाराच्या आरोग्यासाठी खर्च होऊ शकतो. मंदिरात दान केल्यास आर्थिक नुकसान टळू शकते. तुम्ही तुमच्याशी संबंधीत विषयांकडे लक्ष द्या, अन्यथा काही लाभ हे नुकसानीत परावर्तीत होऊ शकतात. तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वृषभ
आजचा दिवस तुमच्यापैकी काही लोकांना वादग्रस्त ठरू शकतो. वरिष्ठांकडून अवहेलना होऊ शकते. सहकारी तुमच्या कमतरता उजेडात आणतील आणि काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. यासाठी या काळात कामातील सहकार्‍यांकडे तुमच्या महत्वकांक्षा व्यक्त करू नका. शक्य झाल्यास तुमचा वेळ पुस्तकांच्या दुकानात घालवा. कौटुंबिक जीवन आणि आरोग्य सामान्य राहिल.

मिथुन
विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. विद्यार्थी स्पर्धेत चांगले यश मिळवतील आणि हव्या त्या संस्थेत प्रवेश मिळवू शकतात. तुमच्यापैकी काहीजण वाहनाशी संबंधीत व्यवसाय आणि कृषीमधून अधिक उत्पन्न मिळवू शकतात. नोकरी करणार्‍यांना कामाच्या ठिकाणी जास्त तणाव आणि दबाव अस्वस्थ करू शकतो. सहकार्‍यांचा विश्वास संपादन करून तुम्ही येणार्‍या दिवसात यश मिळवू शकता. मानसिक तणावामुळे आरोग्य बिघडलेले राहू शकते. आरामासाठी योग्य वेळ घ्या.

कर्क
आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमच्यात भरपूर सकारात्मक उर्जा राहिल. तुमचा उत्साह तुम्हाला बळ प्रदान करेल. ज्यामुळे व्यवसायातील स्थिती तुमच्या बाजून वळेल. तुम्ही तुमच्या साथीदारांचा फायदा होण्यासाठी आणि त्यांना प्रभावित करण्याच्या संधीचा लाभ घ्याल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत साडतील. नवे संपर्क विकसित होण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि व्यवसायिक सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकता. प्रवास फलदायी ठरू शकतो. तुम्ही कुटुंब आणि प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवून आनंद मिळवाल.

सिंह
तुम्हाला नोकरी किंवा कामाशी संबंधित नवे पर्याय मिळू शकतात. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. व्यापाराच्या विस्तारासाठी योजना अंमलात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल. दिलेली आश्वासने पाळा आणि दुसर्‍यांवर विश्वास ठेवा. तुमच्या क्षमता दाखवण्याची ही योग्य वेळ आहे. ब्रेकअप टाळायचा असेल तर एकमेकांवरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. घरातील लोकांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. नाक, कान आणि घसा संबंधी आजारापासून सावध राहा. मेहनत आणि चिकाटीमुळे येणार्‍या दिवसात आर्थिक लाभ होऊ शकतो.

कन्या
भावनात्मक निर्णय घेण्यासाठी वेळ चांगली नाही, कारण या काळात जो निर्णय घ्याल तो पूर्ण करणे अवघड होणार आहे. मनोदशा आणि आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखे वाटू शकते. धाडसाने आणि वेळेचे योग्य फायदा करून घेत लाभ करून घ्या. कुटुंबातील सदस्यांचे आजचे वागणे तुमच्यासाठी एक कोडे ठरेल. सामाजिक आणि भागीदारीच्या कामात विचारपूर्वक पुढे वाटचाल करा. तुम्ही तुमच्या व्यक्तीगत जीवनात शिखरावर असाल. आर्थिक गोष्टी सामान्य राहतील.

तुळ
या कालावधीत नियोजित कार्यात चांगले परिणाम दिसून येणार नाहीत. परंतु परिणाम जे काही असतील ते सकारात्मक असतील. आर्थिक लाभ प्राप्त करण्यासाठी दिवस शुभ आहे. जर तुम्ही कुणाला पैसे उधार दिले असतील तर आज परत मिळतील. कोर्टाच्या बाहेर प्रकरण निकाली निघेल. नोकरी करणार्‍यांचे कामाच्या ठिकाणी एखाद्या ज्येष्ठ महिलेसोबत भांडण होऊ शकते. कौटुंबिक आणि सामाजिक संबंध मजबूत होतील. नवीन मित्र बनवाल. पारंपारिक खाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

वृश्चिक
चांगल्या आरोग्याचा आनंद घ्याल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे नवीन अधिकार असतील ज्याच्यामुळे सामाजिक स्थिती सुधारेल, समाधान वाढेल. नातेवाईक आणि मित्रांशी संबंध सुधारतील. व्यवसायिक क्षेत्रात या काळात सर्व गोष्टी तुमच्या बाजूने असतील. संधी तुमच्या मार्गात येईल आणि तुम्ही तिचा विवेकपूर्ण पद्धतीने वेळेवर वापर कराल. सामाजिकदृष्ट्या तुम्ही अधिक लोकप्रियता आणि प्रतिष्ठा प्राप्त कराल.

धनु
आजचा दिवस तुम्हाला धन आणि प्रसिद्धी देऊ शकतो. जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते. व्यापार आणि व्यवसायात मेहनत आणि प्रभावशाली व्यक्तींच्या सहाय्याने स्थितीत सुधारणा कराल. चोरीमुळे नुकसान होऊ शकते, यासाठी सावधान राहा. तुम्हाला तुमच्या लिखाणातून आणि ओळखीतून काही लाभ होऊ शकतात.

मकर
नोकरीतील स्थितीत सुधारणा होईल. आरोग्य बिघडलेले राहू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोध होऊ शकतो. व्यापारी आणि व्यवसायिक बाबतीत विरोधक प्रतिष्ठा बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. सावध राहा. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. छोट्या प्रवासातून चांगला लाभ मिळेल.

कुंभ
संमिश्र परिणाम मिळतील. परंतु, ते तुमच्या बाजूने असतील. निरर्थक गोष्टीत वेळ आणि उर्जा वाया घालवू नका. निर्णयांवर योग्य लक्ष द्या. जर गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. मित्रांच्या माध्यमातून समस्यांमधून मार्ग काढू शकता. ज्या व्यक्तीवर प्रेम करात, तिचे आरोग्य अचानक चिंतेचा विषय बनू शकते. कौटुंबिक जीवन सामंजस्यपूर्ण राहिल. आरोग्य सामान्य राहिल.

मीन
हा कालावधी सौभाग्यशाली नाही. कुटुंबातही बहिण-भावाशी वाद झाल्याने अस्थिरता निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंध कायम राहतील. मेहनतीच्या बळावर वरिष्ठांना खुश कराल. जर तुम्ही तुमचा द़ृष्टीकोन बदलला आणि ईमानदारीने काम केलेत तर रँक आणि लोकप्रियता वाढेल. तुम्हाला आर्थिक लाभ सुद्धा प्राप्त होऊ शकतो.