दणका ! 4 महिन्यानंतर मार्चमध्ये 1 लाख कोटी पेक्षा कमी झालं GST कलेक्शन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   वस्तू व सेवा कराच्या (GST) आघाडीवर केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे. मार्चमधील जीएसटी कलेक्शन फेब्रुवारी महिन्यापेक्षा कमी होता. मार्चमधील जीएसटी कलेक्शन घसरून 97,597 कोटी रुपये राहिले. फेब्रुवारीचा जीएसटी संग्रह 1.05 लाख कोटी रुपये होता. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 97,597 कोटींपैकी केंद्रीय जीएसटीचे कलेक्शन 19,183 कोटी रुपये होते. त्याच वेळी, राज्य जीएसटी 25,601 कोटी रुपये होता आणि इंटीग्रेटेड जीएसटी संग्रह 44,508 कोटी रुपये होता. त्यात आयातीमधून मिळालेल्या 18,056 कोटी रुपयांचा समावेश आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2020 पर्यंत एकूण 76.5 लाख GSTR-3B रिटर्न दाखल केले गेले आहेत.

4 महिन्यांनंतर 1 लाख कोटींपेक्षा कमी जीएसटी कलेक्शन

मार्चमधील जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, सलग चार महिन्यांपर्यंत जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांवर गेले होते. नोव्हेंबर-डिसेंबर 2019 आणि जानेवारी-फेब्रुवारी 2020 मधील एकूण जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींपेक्षा जास्त होते. फेब्रुवारीमध्ये जीएसटी कलेक्शन 1.05 लाख कोटी रुपये होते

जानेवारी महिन्यासाठी सरकारने जीएसटी कलेक्शनचा अंदाज 1.15 लाख कोटी रुपये ठेवला होता. परंतु, जानेवारीत हा संग्रह 1.10 लाख कोटी रुपये होता. पहिल्या दोन महिन्यांत म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2019 मध्ये जीएसटी संग्रह 1 लाख कोटींपेक्षा जास्त होता. नोव्हेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन 1,03,492 कोटी रुपये होते तर डिसेंबरमध्ये हा आकडा 1,03,184 कोटी होता. दरम्यान, जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर एप्रिल 2019 मध्ये सर्वाधिक जीएसटी संग्रह 1,13,865 कोटी रुपये होते.