‘मर्दानी २’मधील राणी मुखर्जीचा फर्स्ट लुक व्हायरल…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री राणी मुखर्जीचा मर्दानी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता ती मर्दानीचा २ पार्ट मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अशातच मर्दानी २ मधिल तिचा लुक व्हायरल झाला आहे.

राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा हा या चित्रपटाचा निर्माता आहे. व या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथरन हे करणार आहेत. या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याचाच भूमिकेत दिसणार आहे.

तसेच मर्दानी या चित्रपटाची शूटिंग देखील सुरु झाल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मर्दानी २’ या चित्रपटात राणी मुखर्जी २१ वर्षीय खलनायकासोबत फाईट करणार आहे असे देखील सांगितले आहे.

२०१४ साली राणी मुखर्जीने मर्दानी या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटात राणी मुखर्जीने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका उत्तम प्रकारे निभावली होती आणि त्यामुळे तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते. लहान मुलींची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या धाडसी पोलिसाच्या भूमिकेत राणीने सगळ्यांची मनं जिकली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच सुपरहिट झाला. त्याचबरोबर राणी मुखर्जीने चित्रपटात केलेल्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर या चित्रपटाचा २ रा पार्ट येत आहे. २०१९ च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीस येणार आहे.