मृत्यूचे ‘गुढ’ अद्यापही कायम असलेल्या प्रसिध्द हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुनरोचा ‘स्टॅच्यू’ पब्लिक आर्ट स्पेसमधून ‘गायब’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुनरोचा स्टॅच्यू पब्लिक आर्ट स्पेसमधून गायब झाला आहे. या मूर्तिला पेंटेड स्टैनलेस स्टीलसोबतच एल्यूमिनियमचा वापर करुन बनविला आहे. लॉस एंजेलिस पोलीसांने या हरविलेल्या मूर्तिकलेची शोध प्रक्रिया सुरु केली आहे.

पोलीसांनी माहिती दिली की, आमच्याकडे एक साक्षीदार आहे. त्याने एकाला स्टॅचूवर चढताना पाहिले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीला या कलाकृतीच्या खाली उडी मारताना आणि एक बॅगसोबत घेऊन पळताना पाहिले होते. अजून हे स्पष्ट झाले नाही की, त्या बॅगेत नेमके काय होते ?

मर्लिन मुनरो हॉलिवूडची खूप सुंदर अभिनेत्री मानली जात होती. तिचे सौदर्य आणि तिचा ग्लॅमर व तिच्या प्रेमाचे किस्से त्याचबरोबर तिचा अचानक झालेला मृत्यू या सगळ्या गोष्टी पौराणिक कथा बनल्या आहेत.

मुनरोचे नाव अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन कैनेडीपासून ते गायक फ्रैंक सिन्नात्रा आणि बेसबाल खिलाडी जो डिमैगियोपर्यंत जोडले गेले आहे. मुनरोचे अनेक लग्न अयशस्वी ठरले. ती हॉलिवूडची सुपरस्टार होती. ती खूपच आकर्षित होती. अचानक तिचा १९६२ साली मृत्यू झाला. आजही तिचा मृत्यू एक गुप्त रहस्य आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा