उमेदवाराचे छायाचित्र देतानाच चिन्ह हटवायला हवे होते

राळेगणसिद्धी : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूक आयोगाने मतदान यंत्रावर उमेदवाराचे छायाचित्र छापण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मत्र, मतदार यंत्रावरील उमेदवाराचे चिन्ह हटवले तरच भारतीय राज्य घटनेला अभिप्रेत असणारी निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल, असे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेतील उमेदवाराचे निवडणूक चिन्ह हटवावे या मागणीबरोबरच निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हावी यासाठी जनजागृतती करणार असल्याचेही आण्णा हजारे यांनी सांगितले. तसेच प्रसंगी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होण्यासाठी आंदोलन करणार आहे.

निवडणूक प्रक्रियेत सुधारणा कराव्यात, उमेदवाराचे चिन्ह हटवून त्या ऐवजी उमेदवाराचे छायाचित्र छापावे, मतदारांना उमेदवार नाकारण्याचा पर्याय (नोटा) मतदान यंत्रावर असावे, गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल असलेल्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी या मागण्यांसाठी आण्णा हजारे हे गेल्या अनेक वर्षापासून निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करत आहेत.

उमेदवार नाकारण्याचा पर्याय देण्याची मागणी यापूर्वी मान्य झाली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या मतदान यंत्रावर उमेदवाराचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात हजारे बोलत होते.

ह्याही बातम्या वाचा –

संघ आणि भाजपा या दोन्हींच्या विचारधारेला हरवायचं ; काँग्रेसचा संकल्प

सुरेश प्रभुंना उमेदवारी द्या अन्यथा शिवसेनेचा प्रचार करणार नाही

#GST : १ एप्रिल पासून घरे स्वस्त होणार, ‘इतक्या’ लाखांचा होणार फायदा

पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्यानेच मारला ३१ लाखांवर डल्ला

ऑन ड्युटी नाकाबंदी’वर असलेल्या पोलिसाला वाहनाने उडवले