‘या’ दिग्गजानं गुंतवणूकीसाठी दिला ‘गोल्डन’ मंत्र, सोन्यामध्ये मोठया फायद्यासाठी ‘एवढं’ करा ‘इनव्हेस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षी सोन्याच्या दरामध्ये जोरदार तेजी पहायला मिळाली आहे. मार्क मोबियस या दिग्गज गुंतवणूकदाराने सोन्यात भविष्यामध्ये देखील मोठी तेजी राहिली असा अंदाज व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोबियस यांनी सांगितले की सोन्याचे दर कमी जास्त होत राहतील मात्र भविष्यात यामध्ये तेजीचा दिसून येणार आहे.

10 टाक्यांपर्यत सोन्यात गुंतवणूक करू शकता
सोन्यात गुंतवणूक करू पाहणाऱ्यांनी आपल्या उत्पन्नाच्या 10 % रक्कम गुंतवावी असा सल्ला मोबियस यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे. त्यांनी सांगितले की क्रिप्टोकरंसी मुळे बाजारात मोठे खेळते भांडवल देखील आहे. त्यांना देखील समजत नाहीये की नेमके हे पैसे कोठून येत आहेत. अमेरिका आणि युरोप या ठिकाणी पैशांची छपाई मोठ्या प्रमाणावर सुरु आहे याचा अर्थ बाजारात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी तेजी येणार आहे.

भारताने आंतरराष्ट्रीय बॉण्ड आणावेत
भारताला मंदीमधून बाहेर येण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉन्ड सुरु करायला हवेत. युरोपची हालत सध्या खराब आहे त्यामुळे भारतासाठी ही एक चांगली संधी आहे असे मत मोबियस यांनी मांडले.

विदेशी गुंतवणुकीसाठी भारताने प्रयत्न करावेत
गेल्या ऑगस्ट महिन्यात मोबियस असं म्हणाले होते की, काही देशातील आणि देशाबाहेरील गोष्टींमुळे याठिकाणी मंदी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात कमी टॅक्स असल्यामुळे या ठिकाणी विदेशी गुंतवणूकदान मोठी संधी आहे आणि भारत त्याबाबत प्रयत्न करेल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like