स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी शेतकऱ्यांना वाटले 5000 मास्क

लासलगाव – शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लासलगाव कृषी बाजार समितीच्या सभापती यांनी मुख्य बाजार लासलगाव,उपबाजार विंचूर, निफाड येथील सर्व शेतकऱ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले. सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट पसरलेले असतांना ही आपली नैतिक जबाबदरी ओळखत कृ. उ. बा. समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांना मास्क वाटप करून स्वच्छता व सोशल डिस्टन्सचे पालन करत मार्केट मधील व्यवहार सुरळीत ठेवा असे सांगितले.

गेल्या चार महिन्यात मुख्य बाजार लासलगांव ,उपबाजार विंचूर आणि निफाड येथे रोज लिलाव संपल्यावर मार्केट सॅनिटायजरची फवारणी होत आहे. मार्केट कर्मचारी,मापारी, हमाल यांना आर्सेनिक गोळ्या (टॅबलेट)चे वाटप करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सभापतींनी स्वच्छता सामाजिक संदेश देत आरोग्य जपा,मास्क वापरा, कोरोना ला दूर ठेवा असा संदेश दिला याप्रसंगी मार्केट कमिटी संचालक रमेश पालवे, शिवाजी जगताप, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे सुदीप टर्ले,प्रकाश कुमावत,अशोक गायकवाड, दत्तू होळकर, दीपक खैरे, स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, सुरेश विखे, पप्पू कासट, सुनिल डचके, मुकेश कासार, नंदू गोधडे, महेश धामने, सोमनाथशेठ शिरसाठ, विलासशेठ नेवगे, दशरथ राजोळे, अभिषेक महाजन हे उपस्थित होते.