‘रेकॉर्ड’ब्रेक ! सोन्याच्या दराची ‘उच्चांकी’, प्रति 10 ग्रामच्या किंमतीत 1800 रूपयांनी ‘वाढ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम अशियामध्ये भू राजकीय तणाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात मोठी तेजी आली आहे. भारतात सोन्याच्या किंमती सोमवारी गगनला भिडल्या. भारतात सोन्यानं 41,000 रुपयांचा स्तर गाठला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं सहा वर्षांनी एवढ्या उचांकीवर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी हाजिर भावात मोठी तेजी आली आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढल्या कारणाने यावेळी जगभरातील गुंतवणूकादारांचे लक्ष सोन्यावर लागले आहे. याच कारणाने सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 2020 मध्ये सोन्याच्या दरात तेजी आल्याने सोन्याचे दर गंगनाला भिडले आहेत. सोनं हाजिर भाव 2.3 टक्क्यांने वाढले आहे त्यामुळे 1,588.13 डॉलर प्रति औंस झाले आहे. जे एप्रिल 2013 नंतरच्या उच्चतम स्तरावर आहे. या प्रकारे अंतर्गत बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत गडगडल्याने सोन्याच्या किंमतीत तेजी आल्याचे दिसत आहे.

इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 4,395 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 41,330 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. दिल्लीत चांदीचे दर 48,370 रुपये प्रति किलोग्रॅम झाले तर मुंबईमध्ये चांदीचे दर 47,575 रुपये प्रति किलोग्रॅम झाले.

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 31 पैशांनी कमी होऊन 72.11 रुपये प्रति अमेरिकी डॉलरवर आला तर सोन्या-चांदीच्या दर विक्रमी तेजी आली. मागील दोन दिवसात सोन्याचे दर 1800 रुपयांपेक्षा जास्ती वाढले.

एसीएक्समध्ये सोमवारी सुरुवातीला सोन्याचे दर 41,096 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. तर चांदी वायदा देखील 2.08 टक्क्यांच्या तेजीने 48,514 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/