Market Yard Pune Crime News | पुणे : प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणावरून तरुणीला भरस्त्यात मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Market Yard Pune Crime News | प्रेमसंबंध (Love Affair) तोडल्याचा (Break Up) राग मनात धरून प्रियकराने तरुणीच्या भावाला आणि तिला भररस्त्यात मारहाण केली (Marhan). तरुणीच्या भावाच्या डोक्यात काचेची वस्तू मारुन जखमी केले. हा प्रकार 29 मे रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड भागातील बिबवेवाडी रोडवरील (Bibvewadi Road) एका हॉटेल समोर घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत गौतम जगन कांबळे (वय-33 रा. नर्हे धायरी, पुणे) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रवीण अशोक मस्के (वय-31 रा. मु.पो. आंदगाव ता. मुळशी) याच्यावर आयपीसी 323, 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या मावस बहिणीचे आरोपी प्रवीण सोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिने प्रवीणसोबत असलेले प्रेमसंबंध तोडले होते.(Market Yard Pune Crime News)

प्रेमसंबंध तोडत्याच्या राग आरोपीच्या मनात होता. तसेच फिर्यादी यांच्या बहिणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार
दिल्याचा राग प्रवीणच्या मनात होता. 29 मे रोजी फिर्यादी व त्यांची बहीण बिबवेवाडी रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण
करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रवीण मस्के त्याठिकाणी आला.
त्याने प्रेमसंबंध तोडल्याच्या आणि पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या कारणावरुन तसेच फिर्यादी यांच्या बहिणीचे दुसऱ्यासोबत
प्रेम संबंध असल्याच्या संशयावरुन वाद घातला. त्याने प्रेमसंबंध पुन्हा सुरु ठेवावेत यावरुन शिवीगाळ करुन पाहून
घेण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या डोक्यात काचेची वस्तू मारुन गंभीर जखमी केले. तर गौतम यांच्या बहिणीला हाताने मारहाण करुन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : गाडीचा कट मारल्याने माफी मागायला सांगितले, तरुणावर कोयत्याने वार