नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनीने संस्कृत विषयात मिळवले १००% मार्क्स

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील सांगवी मधील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन माध्यमिक विद्यालयाच्या प्राची कारखानीस या विद्यार्थिनीने संस्कृत विषयात १०० पैकी १०० मार्क्स मिळवले आहेत. तर विद्यालयाचा दहावीचा १००% निकाल लागला आहे.

संस्कृत भाषा एकीकडे लोप पावत चालली असताना या शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र संस्कृत विषयात सर्वाधिक मार्क्स मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या शाळेतून संस्कृत विषयासह एकूण ३३ विद्यार्थी होते परीक्षेला बसले होते. ३३ पैकी ३३ मुले उत्तीर्ण झाले असून शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेतून वेदांत ढवळे हा विद्यार्थी ९६. % घेऊन पहिला आला आहे तर, प्राची कारखानीस हिने ९५.६० % मिळवत मुलींमधून पहिली तर विद्यालयातून दुसरा येण्याचा मान मिळवला.

परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले , कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे ,उपाध्यक्ष सतीश साठे व पोपटराव भसे , सचिव परशुराम मालुसरे, खजिनदार रामभाऊ खोडदे , प्रतापराव कळंत्रे , जयवंत आढाव व सर्व संस्था सदस्य यांनी सर्व शिक्षक मुख्याध्यापक व विध्यार्थी यांचे अभिनंदन केले . मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीता मगर , शीतल शितोळे , संस्कृत विषयाचे शिक्षक  संदीप भुसारे , हेमलता नवले , सुनीता टेकवडे , मानसी माळी , दीपाली झणझणे , या शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामुळे शाळेचा निकाल 100% लागला आहे.

काही गुणवंत विद्यार्थ्यांची टक्केवारी

चि .रोहन ढमाळ हा 93.60 गुण मिळवून तिसरा आला , कु अक्षता गायकवाड ही 93.40 गुण मिळवून चौथी व कु अरीफा शेख ही 91.20 गुण मिळवून पाचवी आली आहे. कु .निकिता बीरादार हिला 90.80, चि .ओंकार सूर्यवंशी याला 90.60,कु.प्रियंका खटोड हिला 90.60, कु .श्रुती भोकरे हिला 87.80 ,कु .रूतूजा बांबळे हिला 86.60,कु .प्रियंका शिंदे हिला 86.20, अंजली लोमटे 86.20, चि .प्रतिक पाटील याला 81.40, चि .श्रीराम धुमाळ याला 81.40 ,चि .तेजस उघडे याला 80.20 गुण मिळाले आहेत.

संस्कृत विषयातील काही गुणवंत विद्यार्थी 

प्राची कारखानीस 100 पैकी 100 गुण , 2) वेदांत ढवळे व अक्षता गायकवाड 99 गुण , ४) प्रियंका खटोड 98 गुण , ५) ऋतुजा बांबळे 97 गुण ,६) अरिफा शेख व रोहन ढमाळ 96 गुण , ७) श्रुती भोकरे 95 गुण, ८)बिरादार निकिता व ९) लोमटे अंजली 93 गुण.