‘मर्मबंधातील ठेव ही’ शॉर्ट फिल्म NFAI येथे प्रदर्शित होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेल्या ‘मर्मबंधातील ठेव ही’ नावाची शॉर्ट फिल्म येत्या २९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात प्रदर्शित होणार आहे.

समांतर रेषा अनंताला मिळतात, पण वास्तवात एखाद्या नात्यातले घटक या समांतर रेषांसारखे असतील. नात्यांचा भावनिक पातळीवर होणार मेळ यांचा शोध घेणारे कथानक असणाऱ्या फिल्मचे दिग्दर्शन व लेखन समीर महागावकर यांनी केले आहे. नातं नेहमी काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करीत असतं. ते समजून घेणं आपल्याला जमायला हवं. एका वयस्कर लेखकाची असणारी ही प्रेमाची गोष्ट आहे.

शॉर्ट फिल्म्स द्वारे वेगवेगळे विषय हाताळताना तरुणाई दिसून येते आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळींवर शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. करिअर म्हणून सुद्धा हल्ली तरुणाई या क्षेत्राचा विचार करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/